प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • ९० वर्षांचा गौरवशाली प्रवास – न्यायमूर्ती रानडे बालक मंदिराचा वर्धापन दिन

९० वर्षांचा गौरवशाली प्रवास – न्यायमूर्ती रानडे बालक मंदिराचा वर्धापन दिन

९० वर्षांचा गौरवशाली प्रवास – न्यायमूर्ती रानडे बालक मंदिराचा वर्धापन दिन

आज १ जून २०२५ रोजी न्यायमूर्ती रानडे बालक मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.  या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये माजी विद्यार्थी यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली तसेच यावर्षी शाळेने ९० व्या वर्षात पदार्पण केले असल्याने ९० दिवे संस्थेचे सर्व पदाधिकारी व माजी विद्यार्थी यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आले.  या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर शाळेची वेबसाईट करण्यात आली आहे त्याचे देखील उद्घाटन यावेळेस करण्यात आले.  आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी श्री. राजेंद्र देवळे यांनी शाळेने 90 व्या वर्षात पदार्पण केले त्याप्रित्यर्थ लोगो तयार केला त्याचे देखील अनावरण आज करण्यात आले. 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कौन्सिल मेंबर व मा स. गोळवलकर प्रशालेचे शाला समिती अध्यक्ष मा. मिलिंद कांबळे सर, नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. कल्पनाताई वाघ,  डी इ एस  सेकंडरी शाळेच्या मुख्याध्यापिका व आमच्या माजी विद्यार्थीनी विजयाजी जोशी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे IT विभागाचे प्रमुख मा. बोकील  सर, तसेच ही वेबसाईट बनवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा स्नेहा वाडेकर व प्रियांका शिंदे यादेखील कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिल्या. शालासमिती अध्यक्ष मा. जोग सर यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, मुख्याध्यापिका मा. अमिता ताई यांचे नेमके व नेटके नियोजन यामुळे  नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली. 

कार्यक्रम

  •  दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

    दसरा खेळांचे पूजन आ ...

    दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

    Read More
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

    नवरात्रीनिमित्त -अष् ...

    रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More

  • भोंडला

    भोंडला

    आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More

  • बिनभिंतीची शाळा’ -  अष्टभुजा देवी

    बिनभिंतीची शाळा’ - ...

    मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स