ज्ञान, खेळ आणि आनंदाची शाळा
प्ले ग्रुप : गाणी, गोष्टी, खेळ मिनी केजी : गाणी, गोष्टी, खेळ, स्पोकन इंग्लिश, प्रकल्प पद्धत, सामान्य ज्ञान, हस्तव्यवसाय
छोटा गट : मुळाक्षरांची ओळख, पाटीवर अक्षरांचे अवयव लेखन, स्पोकन इंग्लिश, बोली संस्कृत, सामान्य ज्ञान, हस्तव्यवसाय, गाणी, गोष्टी, खेळ, योगासने
मोठा गट : मुळाक्षरांचे लेखन,
१ ते २० अंक लेखन, मोजणी, १ ते १० पुढचा अंक, १ ते १० मधला अंक, स्पोकन इंग्लिश, बोली संस्कृत, सामान्य ज्ञान, गाणी, गोष्टी, खेळ, योगासने.
शिक्षणाची रंगीत दुनिया
खेळ, गाणी, गोष्टी आणि हस्तकलेच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास. प्रत्येक गटासाठी वयोगटानुसार आखलेला समृद्ध अभ्यासक्रम.
आनंदी शिक्षण... समृद्ध भविष्य
शाळेमध्ये देववाणी म्हणजेच बोली संस्कृत शिकविले जाते. संस्कृत मुळे उच्चार स्पष्ट होण्यास मदत होते.
तसेच सध्याच्या काळात आवश्यक असणारी भाषा म्हणजे इंग्लिश. शाळेमध्ये स्पोकन इंग्लिशचा तास असतो.
लहान पावलांनी मोठ्या स्वप्नांकडे
खेळाच्या माध्यमातून मुळाक्षरांची ओळख, अंकाची ओळख त्याच बरोबरीने लेखन करत मुलांचा बौद्धिक विकास केला जातो.
लाकडी अक्षरांचा वापर विविध शब्द तयार करताना.
कृतीतून शिकण्याची शाळा
शाळेने सुरुवातीपासूनच क्रिडन पद्धतीचे शिक्षण यावर भर दिला.
शाळेमध्ये विषयानुरूप वर्ग मांडणी केली जाते. हा आमचा जीवनव्यवहार. या आणि अशा विविध खेळांवर मुले आनंदाने खेळतात व त्यातूनच त्यांचा आत्मविश्वास व जिज्ञासा वाढीस लागते
ज्ञान, क्रीडा आणि संस्कार यांचा संगम
शैक्षणिक विषयांसोबतच सण- उत्सव, फॅन्सी ड्रेस, स्नेहसंमेलन, क्रीडा दिन या उपक्रमांचा अंतर्भाव आणि म्हणूनच आम्ही अभिमानाने सांगू शकतो की इथे येणाऱ्या प्रत्येकाचा एक आनंददायी शिक्षण प्रवास असेल.
खेळत शिकण्याची गोष्ट
बिन भिंतीची शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थी विविध स्थळांना भेटी देतात. सामान्य ज्ञानात भर पडतेच परंतु शिस्त एकजूट वाढीस लागते
वयोगटा नुसार विविध श्लोकांच्या स्पर्धा घेतल्या जातात. स्मरणशक्ती वाढीस लागते तर उच्चार स्पष्ट होण्यास मदत होते.