प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • शिक्षक दिन विशेष!

शिक्षक दिन विशेष!

शिक्षक दिन विशेष!

🌸📚 शिक्षक दिन विशेष! 📚🌸

भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.शिक्षक म्हणजे केवळ ‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंत अक्षरांचे ज्ञान देणारे नव्हेत, तर अंक, आकार, रंग यांची ओळख करून देत बालमनाला शिकण्याची, विचार करण्याची आणि जगण्याची दिशा देणारे मार्गदर्शक! आज न्या. रानडे बालक मंदिर, पुणे येथे शिक्षक दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. रोज आपल्या चिमुकल्यांना शाळेत सोडायला येणाऱ्या काही आई पालकांनी आज चक्क ‘बाईंची’ची भूमिका साकारली.नेहमीच्या बाईंना पाहणाऱ्या चिमुकल्यांना आज आपल्या बाईंसोबत “या कोण नवीन बाई?” 🤔😊 असे एक गोड प्रश्नचिन्ह मुलांच्या चेहऱ्यावर होते…त्यामुळे कुतूहल, आश्चर्य आणि उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.पण एकदा ओळख झाली आणि संवाद सुरू झाला… मग काय! गाणी, खेळ, गोष्ट आणि वेगवेगळ्या मजेदार उपक्रमांमध्ये मुले अगदी रमून गेली. मुलांनीही भरभरून प्रतिसाद दिला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता! 😍शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांची भूमिका अनुभवण्याची संधी पालकांना आणि आईंच्या या भूमिकेतून मुलांना शिकण्याचा एक वेगळाच अनुभव मिळाला.हा सुंदर उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. अमिता ताई दाते यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.“शिक्षक शिकवतात… पालक साथ देतात… आणि या दोघांच्या हातून घडते बालमनाची सुंदर जडणघडण!”

कार्यक्रम

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

  • बिनभिंत उपक्रम -  झाशीची राणी पुतळा

    बिनभिंत उपक्रम - झा ...

    बिनभिंती’ उपक्रमांतर्गत मोठ्या गटातील मुलांनी ब ... Read More

  • दहीहंडी  श्रीकृष्ण जन्माष्टमी

    दहीहंडी श्रीकृष्ण ज ...

    शाळेत छोटा गट आणि मोठा गटातील चिमुकल्यांसोबत द ... Read More

  • ‘पाऊसपंचम’

    ‘पाऊसपंचम’

    मराठीशाळा

    🌧️ ‘पाऊसपंचम’ — जलचक्राची अनोखी ... Read More

  • गणेशोत्सव

    गणेशोत्सव

    सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.० ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स