- Events /
- शाळेचे स्नेहसंमेलन
शाळेचे स्नेहसंमेलन
शाळेचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम म्हणजेच शाळेचे स्नेहसंमेलन. दरवर्षी शाळेचे माजी विद्यार्थी यांना स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करतो. यातूनच माजी विद्यार्थ्यांशी असलेला स्नेह वृद्धिंगत होतो. माजी विद्यार्थ्यांनी घेतलेली भरारी, केलेली उत्तुंग कामगिरी ही पुढील पिढीसाठी नक्कीच प्रोत्साहन देणारी ठरू शकते. आमच्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे मुले सूत्रसंचालन देखील यावेळेस करतात.
यावर्षी म्हणजेच शनिवार दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी शाळेचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात साजरे झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. अंकुर पटवर्धन उपस्थित होते. या वर्षी विविध प्रांतानुसार लोकनृत्य असा विषय देण्यात आला असल्याने गुजराथी, राजस्थानी, मणिपूरी, कोळीगीत, भांगडा असे नाच बसविण्यात आले. नवीन मराठी प्रशालेच्या मुख्याध्यपिका सौ. कल्पना वाघ कार्यक्रमांस आवर्जून उपस्थित राहून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मा. डॉ. अंकुर पटवर्धन यांनी आपल्या स्नेहसंमेलनच्या वेळेसचे मजेशीर अनुभव सांगत वातावरणात मिश्किलता निर्माण केली . मा. मुख्याध्यापिका अमिता ताई यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम नियोजनबद्ध असा झाला.
कार्यक्रम
-
दसरा खेळांचे पूजन आ ...
दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼
Read More -
नवरात्रीनिमित्त -अष् ...
रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More
-
भोंडला
आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More
-
बिनभिंतीची शाळा’ - ...
मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More
-
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More