- Events /
- संस्थापक दिन
संस्थापक दिन
संस्थापक दिन : महान कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा! न्या. रानडे बालक मंदिर, पुणे येथे संस्थापक दिन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या महान संस्थापकांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी मोठ्या गटातील चिमुकले विद्यार्थी संस्थापक आणि अध्यक्षांच्या वेशभूषेत सहभागी झाले. त्यांच्या वेशभूषेतून जणू त्या महान व्यक्तिमत्त्वांचे रूपच आपल्या समोर साकार झाले, असा सुंदर अनुभव सर्वांना आला. चिमुकल्यांनी संस्थापकांच्या जीवनकार्याची, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य विचारांची माहिती सर्वांसमोर उत्साहाने मांडली.इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांना केवळ पुस्तकातून न शिकता, त्यांचे रूप साकारून, त्यांचे कार्य समजून आणि त्यांच्या विचारांना आपल्या मनात रुजवून मुलांनी संस्थापक दिनाचा खरा अर्थ अनुभवला.या उपक्रमातून मुलांमध्ये आपल्या संस्थेच्या गौरवशाली इतिहासाविषयी अभिमान, कृतज्ञता आणि प्रेरणा निर्माण झाली.
🙏 डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व संस्थापक व अध्यक्षांना विनम्र अभिवादन! 🙏
कार्यक्रम
-
दसरा खेळांचे पूजन आ ...
दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼
Read More -
नवरात्रीनिमित्त -अष् ...
रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More
-
भोंडला
आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More
-
बिनभिंतीची शाळा’ - ...
मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More
-
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More