- Events /
- नवदुर्गा – डेक्कनचा अभिमान
नवदुर्गा – डेक्कनचा अभिमान
साडेतीन शक्तीपीठा सारखा हा तेजोमय दरबार,
ज्ञानसंस्कारांची ठेवण सांभाळणाऱ्या या नवदुर्गा अपार।
कधी सरस्वतीचा अवतार, कधी लक्ष्मीचा साक्षात्कार,
कधी पार्वतीच्या मायेने, घडते जीवन सुंदर फार।
विद्येच्या या किल्ल्याला, उभा केलेला भक्कम तट,
डेक्कनच्या या नवदुर्गा, घडवीत आहेत भावी जगत।
कणखरतेत शूरवीर, करुणेने त्या मृदुज्योती,
कर्तृत्वाने प्रज्वललेल्या, आशेच्या या दिव्य ज्योती।
आज समाज गातो गाथा, त्यांच्या कार्यकिर्तीची,
डेक्कनच्या या नवदुर्गा, शान आहेत शाळेच्या
शाळेत नवरात्रीमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी डेक्कन एज्युकेशन सोसायटी नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्य मा. प्राजक्ताताई प्रधान
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या G. B सेक्रेटरी व आजीव सदस्या मा. स्वातीताई जोगळेकर
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्या तसेच अहिल्यादेवी प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा मा.प्रीतीताई अभ्यंकर
नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. हेमा ताई जाधव
एन ई एम एस प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. हेमांगी देशमुख
एन ई एम एस पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. शिल्पा कुलकर्णी
मातृ मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका मा. माधुरी बर्वे मा.स गोळवलकर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. अपर्णा साने.
कार्यक्रम
-
दसरा खेळांचे पूजन आ ...
दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼
Read More -
नवरात्रीनिमित्त -अष् ...
रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More
-
भोंडला
आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More
-
बिनभिंतीची शाळा’ - ...
मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More
-
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More