प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • स्वातंत्र्यदिन विशेष उपक्रम

स्वातंत्र्यदिन विशेष उपक्रम

स्वातंत्र्यदिन विशेष उपक्रम

१५ ऑगस्ट — स्वातंत्र्यदिन विशेष उपक्रम

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून न्या. रानडे बालक मंदिर, पुणे येथे छोटेखानी आणि आनंददायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात छोट्या व मोठ्या गटातील बालकांना राष्ट्रीय तिरंग्याची ओळख व त्याचे महत्त्व सोप्या आणि मुलांना समजेल अशा पद्धतीने सांगण्यात आले. तसेच देशभक्तीपर गोष्ट सांगून मुलांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यात आली आणि सर्वांनी उत्साहाने देशभक्तीपर गीत गायले.

यासोबतच मुलांना स्वच्छतेचे महत्त्व आणि स्वच्छतेचे नियम समजावून सांगण्यात आले. स्वच्छ शाळा, स्वच्छ परिसर आणि स्वच्छ भारत यासाठी प्रत्येकाने आपली छोटीशी जबाबदारी पार पाडावी, हा संदेश देण्यात आला.

अशा छोट्या-छोट्या कृतींतून मुलांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रीय अभिमान, स्वच्छतेची जाणीव आणि जबाबदारीची भावना रुजवण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला.

हा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. अमिता ताई दाते यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

“तिरंगा फक्त हातात नाही, तर आपल्या मनात आणि कृतीतही असू दे!”

कार्यक्रम

  •  दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

    दसरा खेळांचे पूजन आ ...

    दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

    Read More
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

    नवरात्रीनिमित्त -अष् ...

    रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More

  • भोंडला

    भोंडला

    आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More

  • बिनभिंतीची शाळा’ -  अष्टभुजा देवी

    बिनभिंतीची शाळा’ - ...

    मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स