प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • गुरू पौर्णिमा

गुरू पौर्णिमा

गुरू पौर्णिमा

गुरू पौर्णिमा

✨🏏 अभ्यासासोबत मैदानी खेळांचे महत्त्व रुजवणारे आमचे मैदानावरील गुरू! ⚽✨

"गुरू म्हणजे फक्त वर्गात शिकवणारे शिक्षक नव्हेत, तर आयुष्याला योग्य दिशा देणारे प्रत्येक व्यक्तिमत्त्व हेच खरे गुरू!" 🙏

याच भावनेतून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आमच्या शाळेत एक आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाइतकेच मैदानी खेळही महत्त्वाचे आहेत, हा संदेश देत खेळ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडागुरूंचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर खेळ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, अनेक गुणवंत खेळाडू घडवणारे आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड, शिस्त व संघभावना रुजवणारे सर्व क्रीडागुरूंचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी NEMS शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. प्रमोद उकिर्डे सर व श्री. देवीदास वाकळे सर, नवीन मराठी शाळेचे तायक्वांदो प्रशिक्षक श्री. दिनेश भुजबळ सर तसेच 'फायनल विसल' कोअर टीमचे सदस्य असलेले शाळेचे माजी विद्यार्थी श्री. अमरनाथ चक्रदेव सर , श्री. वरुण परदेशी,माजी विद्यार्थी तसेच आजी-पालक श्री. उमेश शिंदे सर या सर्वांचे मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर मा. सौ. हेमाताई जाधव आणि मा. सौ. अमिता ताई दाते यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा स्नेहभेट देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी गुरू-शिष्याच्या वेशभूषेत सहभागी होऊन गुरू-शिष्य परंपरेवरील सुंदर कथा सादर केल्या.

छोट्या गटातील विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने सुंदर हस्तनिर्मित शुभेच्छापत्रे तयार केली. ही शुभेच्छापत्रे शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. अमिता ताई दाते, शाळेतील सर्व मावशी आणि जीवन दादा यांना प्रेमपूर्वक भेट देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाला शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. अमिता ताई दाते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रम

  •  दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

    दसरा खेळांचे पूजन आ ...

    दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

    Read More
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

    नवरात्रीनिमित्त -अष् ...

    रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More

  • भोंडला

    भोंडला

    आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More

  • बिनभिंतीची शाळा’ -  अष्टभुजा देवी

    बिनभिंतीची शाळा’ - ...

    मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स