- Events /
- गणेशोत्सव
गणेशोत्सव
सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता ‘श्रीं’ची स्थापना करण्यात आली. यावेळी न्या. रानडे बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका मा. सौ. अमिता ताई दाते आणि नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. हेमाताई जाधव यांनी गणपती बाप्पाचे औक्षण करून भक्तिभावाने स्वागत केले. 🌺🙏
यावेळी दोन्ही शाळांचा स्टाफ, तसेच नवीन मराठी शाळेतील तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक उपस्थित होते.
🌺 मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी न्या. रानडे बालक मंदिरातील सर्व गटांतील मुले गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी हॉलमध्ये एकत्र जमली. सर्वांनी मिळून भक्तिभावाने आरती म्हटली. .. तसेच प्रणम्य शिरसा देवं आणि अथर्वशीर्ष याचे पठण केले. 🙏🥁
यावेळी शाळेच्या शिक्षिका सौ. सुरेखा ताई यांनी मुलांना गणपती उत्सवाची माहिती सांगितली. गणपतीची गाणी म्हणत मुलांनीही आनंदाने सहभाग घेतला. 🎶🌺
मा. सौ. अमिता ताई दाते यांच्या हस्ते मुलांना आंबा मोदक प्रसाद म्हणून देण्यात आला. मोदकाचा गोडवा आणि बाप्पाच्या दर्शनाचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता.
🙏 गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! 🙏
कार्यक्रम
-
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More
-
बिनभिंत उपक्रम - झा ...
बिनभिंती’ उपक्रमांतर्गत मोठ्या गटातील मुलांनी ब ... Read More
-
दहीहंडी श्रीकृष्ण ज ...
शाळेत छोटा गट आणि मोठा गटातील चिमुकल्यांसोबत द ... Read More
-
‘पाऊसपंचम’
मराठीशाळा
🌧️ ‘पाऊसपंचम’ — जलचक्राची अनोखी ... Read More
-
गणेशोत्सव
सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.० ... Read More