प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • १९६९ च्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा – आठवणींचा, आनंदाचा आणि आपुलकीचा सोहळा

१९६९ च्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा – आठवणींचा, आनंदाचा आणि आपुलकीचा सोहळा

१९६९ च्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा – आठवणींचा, आनंदाचा आणि आपुलकीचा सोहळा

४ ऑक्टोबर रोजी डे. ए. सो.च्या न्या. रानडे बालक मंदिरात १९६९ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मा. दाते बाई, राजेंद्र देवळे, सुनंदन लेले, रविबाला लेले, रामकृष्ण शिंदे आणि संध्या देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.
मा. मुख्याध्यापिका अमिता दाते यांनी प्रास्ताविक करत शाळेतील सध्याच्या उपक्रमांची माहिती दिली. माजी विद्यार्थी प्रणव जोशी यांनी तयार केलेल्या शाळेच्या उपक्रमांवरील व्हिडिओ क्लिपचे प्रदर्शनही करण्यात आले.

औपचारिक कार्यक्रमानंतर सूत्रसंचालनाची धुरा माजी विद्यार्थीनी वीणा काकतकर-भावे यांनी सांभाळली. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनात राजेंद्र देवळे सरांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले. त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क ठेवत बॅचेस तयार करणे, फ्लेक्स बनविणे यांसारख्या अनेक जबाबदाऱ्या स्वतःहून पार पाडल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे मेळावा अत्यंत संस्मरणीय ठरला.

या कार्यक्रमाची गोड आठवण कायम राहावी म्हणून देवळे सरांनी स्वतः डिझाइन केलेले शाळेचे नाव असलेले फ्रिज मॅग्नेट सर्वांना भेट म्हणून दिले. माजी विद्यार्थ्यांनी खेळ, गप्पा आणि जुन्या आठवणींमधून पुन्हा शालेय दिवस अनुभवले. ही ओळखपर खेळाची कल्पना नीता लघाटे-केळकर यांची होती. तसेच प्रशांत जोशी यांनी मनाचे श्लोक याचे हस्तलिखित शाळेला भेट दिले.
शेवटी देवळे सरांच्या आभार प्रदर्शनाने या आठवणींनी भरलेल्या मेळाव्याची सांगता झाली.

कार्यक्रम

  •  दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

    दसरा खेळांचे पूजन आ ...

    दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

    Read More
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

    नवरात्रीनिमित्त -अष् ...

    रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More

  • भोंडला

    भोंडला

    आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More

  • बिनभिंतीची शाळा’ -  अष्टभुजा देवी

    बिनभिंतीची शाळा’ - ...

    मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स