- Events /
- बिनभिंतीची शाळा - गणपतीची मूर्ती बनवणे
बिनभिंतीची शाळा - गणपतीची मूर्ती बनवणे
बिनभिंतीची शाळा – अनुभवातून शिक्षण 🌺
आज बिनभिंतीच्या शाळा उपक्रमाअंतर्गत मोठ्या गटातील मुलांना गणपतीची मूर्ती कशी बनवली जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी सौरभ मराठे सर आणि निनाद जोग सर शाळेत आले होते.
दोन्ही सरांनी मुलांसमोर अतिशय सुंदर अशी गणपतीची मूर्ती साकारून दाखवली. 🙏🌺
मूर्ती घडवताना लागणारे कौशल्य, बारकावे आणि कलात्मकता मुलांनी अगदी उत्सुकतेने पाहिली.
सौरभ मराठे सर आणि निनाद जोग सर हे डॉ. बी. एन. कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून त्यांनी मुलांसाठी हा सुंदर अनुभव दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! 🌸
मातीला आकार देताना मुलांनी कला, सर्जनशीलता आणि संयम यांचा सुंदर संगम अनुभवला.
वर्गाच्या चार भिंतींपलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची हीच तर बिनभिंतीची शाळा! 🌿✨
मा. सौ. अमिता ताई दाते यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांसाठी हा अनुभव आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रम
-
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More
-
बिनभिंत उपक्रम - झा ...
बिनभिंती’ उपक्रमांतर्गत मोठ्या गटातील मुलांनी ब ... Read More
-
दहीहंडी श्रीकृष्ण ज ...
शाळेत छोटा गट आणि मोठा गटातील चिमुकल्यांसोबत द ... Read More
-
‘पाऊसपंचम’
मराठीशाळा
🌧️ ‘पाऊसपंचम’ — जलचक्राची अनोखी ... Read More
-
गणेशोत्सव
सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.० ... Read More