प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • नागपंचमी

नागपंचमी

नागपंचमी

🌿🐍 श्रावणातील सणांची सुंदर सुरुवात – नागपंचमी 🐍🌿

श्रावण आला की निसर्ग हिरवागार होतो आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीतील विविध सणांची चाहूल लागते. याच आनंदी वातावरणात न्या. रानडे बालक मंदिर, पुणे येथे नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

नागपंचमीच्या निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ.अमिता ताई यांच्या हस्ते नागदेवतेची प्रतिमेची पूजा करण्यात आली. पूजेनंतर प्ले ग्रुप, मिनी केजी आणि छोट्या गटातील मुलांना श्रद्धा ताई थोपटे यांनी नागपंचमीचे महत्त्व, सणामागील परंपरा आणि निसर्गातील सजीवांविषयीची संवेदनशीलता यांची ओळख करून दिली. तर मोठ्या गटातील मुलांना स्मिता ताई आगरकर यांनी नागपंचमीचे महत्त्व व सणाशी संबंधित सुंदर गोष्ट सांगत आपल्या समृद्ध परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून दिली. गोष्टीच्या माध्यमातून सांगितलेली माहिती मुलांनी मोठ्या उत्सुकतेने ऐकली. 🐍🌿

सणाचा आनंद आणखी वाढला तो मेंदीच्या उपक्रमाने! ताईंनी मुलांच्या छोट्या-छोट्या हातांवर सुंदर मेंदी काढली. हातावर उमटणाऱ्या प्रत्येक नक्षीसोबत मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारे आनंदाचे हास्य हा या दिवसाचा खास क्षण ठरला. ❤️

पूजा, गोष्ट, संस्कार आणि आनंदी कृती अशा सुंदर संगमातून नागपंचमीचा सण मुलांसाठी अविस्मरणीय ठरला.

कार्यक्रम

  •  दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

    दसरा खेळांचे पूजन आ ...

    दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

    Read More
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

    नवरात्रीनिमित्त -अष् ...

    रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More

  • भोंडला

    भोंडला

    आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More

  • बिनभिंतीची शाळा’ -  अष्टभुजा देवी

    बिनभिंतीची शाळा’ - ...

    मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स