- Events /
- डॉ. मादाम माँटेसरी जयंती व ताराबाई मोडक पुण्यतिथी कार्यक्रम
डॉ. मादाम माँटेसरी जयंती व ताराबाई मोडक पुण्यतिथी कार्यक्रम
दिनांक ३१ ऑगस्ट रोजी शाळेत डॉ. मादाम माँटेसरी यांचा जन्मदिवस तसेच ताराबाई मोडक यांची पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाफुली गटातील अंश महापुरे याने इंग्लिशमधून अतिशय सुंदर पद्धतीने केले. जाई गटातील अनुज शेवते याने डॉ. मादाम माँटेसरी यांच्या जीवनकार्याची व शैक्षणिक विचारांची माहिती सांगितली. तसेच चाफा गटातील व्योमेश इनामदार याने ताराबाई मोडक यांच्या कार्याची व बालशिक्षणातील योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.यानंतर विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचे उत्साहाने सादरीकरण केले. काही विद्यार्थ्यांनी Poem, Prayer, Fruit Information, Fruit Names आणि Animals Names यांचे सुंदर सादरीकरण केले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रणव पाठक याने उपस्थितांचे आभार मानले.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे कार्यक्रम आनंददायी, माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रम
-
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More
-
बिनभिंत उपक्रम - झा ...
बिनभिंती’ उपक्रमांतर्गत मोठ्या गटातील मुलांनी ब ... Read More
-
दहीहंडी श्रीकृष्ण ज ...
शाळेत छोटा गट आणि मोठा गटातील चिमुकल्यांसोबत द ... Read More
-
‘पाऊसपंचम’
मराठीशाळा
🌧️ ‘पाऊसपंचम’ — जलचक्राची अनोखी ... Read More
-
गणेशोत्सव
सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.० ... Read More